आश्रम शाळा गुही येथे गुरुवार दिनांक १८/१२/२०२५ ते १९/१२/२०२५ पर्यंत संपन्न झालेल्या सुरगाणा तालुका स्तरीय विज्ञान प्रदर्शनाचा बक्षीस वितरण सोहळा नुकताच पार पडला. त्यामध्ये अनुदानित प्राथ. माध्य. व उच्च माध्यमिक आश्रम शाळा चिंचला यांनी उच्च प्राथमिक गटात द्वितीय क्रमांक तसेच माध्य. व उच्च माध्यमिक गटात तृतीय क्रमांक मिळवत जिल्हा स्तरावर निवड झाली असून शिक्षक प्रतिकृती मध्ये उच्च माध्यमिक गटात प्राध्यापक श्री.गांगुर्डे दशरथ एकनाथ यांनी प्रथम क्रमांक प्राप्त करून जिल्हास्तरावर निवड करण्यात आली.