कालचे दिवशी महानुभाव गुरुकुल तर्फे आयोजित संस्कार शिबिरात छोट्या मुलांशी गप्पा गोष्टी करत त्यांना प्रार्थना शिकवली.या छोट्या मुलांमध्ये अफाट शक्ती असते.
गरज असते ती दिशा देण्याची , त्यांच्यातील क्षमतांची ओळख करून देण्याची, या संस्कारक्षम वयात मूल्यांची रुजवण करण्याची. मानवता हाच धर्म याची शिकवण या प्रार्थनेच्या माध्यमातून मुलांना शिकायला मिळाले.
मुलांचा प्रतिसाद अतिशय प्रशंसनीय होता.
लहान मुलांसोबत एक तास कसा गेला ते कळलेच नाही.
तो एक तास माझ्या मनाला मात्र आनंद देऊन गेला.